Vedat Marathe
Vedat Marathe is a Marathi poem by the eminent Marathi poet, writer and humanist Kusunagraj. The original poem is a lengthy story of seven brave Mawalas. It is often condensed into a song with 4 stanzas as below. The song is also known by the words of the first line “Myanatun usale talvarichi paat.”
म्यानातून उसळे तलवारीची पात वेडात मराठे वीर दौडले सात ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले सरदार सहा सरसावुनि उठले शेले रिकबीत टाकले पाय, झेलले भाले उसळले धुळीचे मेघ सात निमिषात आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना छावणीत शिरले थेट भेट गनिमांना कोसळल्या उल्का जळत सात दर्यात खालून आग, वर आग, आग बाजूंनी समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी गदीर्त लोपले सात जीव ते मानी खग सात जळाले अभिमानी वणव्यात दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा ओढयात तरंगे अजूनि रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचा अद्याप विराणी कुणी वार्यावर गात
Leave a comment
Line and paragraph breaks automatic, e-mail address never displayed, some HTML allowed.